Sunday, March 24, 2019

पोषक वड्या (प्रोटीन बार)

साहित्य:

  • २.५ वाट्या ओट्स
  • १/२ वाटी तूप किंवा Almond/Peanut/Mix Nuts Butter
  • १/२ वाटी मध किंवा मेपल सिरप किंवा आगावे स्वीटनर
  • चिमूटभर मीठ

कृती
सगळं नुसतंच हाताने एकत्र करुन (किंवा फुड प्रोसेसरमधून काढणे) पसरट भाड्यांत थापणे. साधारण एक तास फ्रिजमध्ये किंवा बाहेर ठेवावं. नंतर पाहिजे त्या आकारात वड्या कापाव्यात.

टिप: ओट्स आधी घालून इतर घटक हळूहळू एकत्र केले तर पाहिजे तसं प्रमाण कमी जास्त करता येईल.





Thursday, June 21, 2018

आर्टिचोक आणि रॅंच ड्रेसिंगचा पिझ्झा

साहित्य:2 Crescent Rolls
1 डबा आर्टीचोक तुकडे, निथळून घेतलेले.
1 वाटी किसलेलं चीज
3/4 कप रॅंच सलाड ड्रेसिंग
1 भोपळी मिरची बारिक चिरलेली.

कॄती:
Crescent Rolls उलगडून लाटा.
375 डिग्रीवर 8 मिनिटं भाजा. हलका तपकिरी रंग येईपर्यंत. पूर्ण भाजायचा नाही.
वर लिहिलेलं सर्व साहित्य एकत्र हाताने मिसळा.
भाजलेल्या तुकड्यावर साहित्य पसरा.
पुन्हा 375 डिग्रीवर 12 मिनिटं भाजा.
गार झाल्यावर चौकोनी तुकडे कापा.

एकूण - 18 - 22 छोटे तुकडे कापले जातात




Tuesday, February 14, 2017

चटणी आणि चीजच्या पार्‍या

साहित्य:
२/३ कप बारीक चिरलेले टॉमेटो
१/३ कप मेयॉनिस (Mayonnaise)
१/४ कप किसलेलं चीज
२ चमचे हिरवी चटणी/ पेस्तो
चिमूटभर मिरी पावडर
१ पाकिट गोठवलेल्या पार्‍या (Fillo Tart Shells)

कृती:
एका भांड्यात टॉमेटो, मेयॉनीस, चीज, चटणी/पेस्तो आणि मिरी पावडर एकत्र करा. एकेका पारीत एकेक चमचा मिश्रण घाला. आणि ३५० फॅरेनहाईट वर ओव्हन गरम करुन १२ मिनिटं  भाजा.

१५ पार्‍या तयार होतात.










Saturday, March 12, 2016

काकडीच्या वड्या

साहित्य:
१ मोठी काकडी
१/४ वाटी गुळ
३/४ वाटी भाजलेला रवा
१/४ वाटी ओलं खोबरं
वेलची पावडर
चिमूटभर मीठ

कृती:
काकडी सालं काढून किसून पिळून पाणी वेगळं काढा.
काकडीच्या किसामध्ये गुळ, रवा, ओलं खोबरं, वेलची पावडर,मीठ आणि काकडीच्या पाण्यातील ३/४ पाणी घालून एकत्र करा. मिश्रण ओलसर पाहिजे. (काकडीला पाणी सुटतं त्यापेक्षा थोडं कमी लागतं.)
४० मिनिटं प्रेशरकुकरमधील शिट्टी काढून वाफवा (इडलीप्रमाणे)
गार झाल्यवर वड्या कापून तूपाबरोबर खा.
साधारण १२- १५ वड्या होतात.

Monday, February 1, 2016

क्रिमी टॅको बोटी

साहित्य:
३/४ कप नारळाचं दुध (मी कॅन मधलं वापरलं आहे)
१/२ कप कंडेंन्स्ड मिल्क
१/२ कप अननस रस
१/४ चमचा मीठ
२ चमचे कॉर्नस्टार्च
१ अंड्यातील पिवळा बलक
२ चमचे तूप
१ पॅक टॅको बोट्स टॉरटिया
१ कप व्हिप्ड क्रिम (ऐच्छीक)
१ चमचा बदाम, भाजलेलं सुकं खोबरं

कृती:
नारळाचं दुध, कंडेंन्स्ड मिल्क, अननस रस, कॉर्नस्टार्च, मीठ आणि बलक (फेटून) एकत्र करुन मध्यम गॅसवर उकळवा. उकळवताना सतत ढवळत रहा. साधारण ३-४ मिनिटं लागतात. मिश्रण  घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करा. किंचित गार झाल्यावर ढवळून फ्रिजमध्ये  कमीत कमी २ तास ठेवा.

ओव्हन 375°F. वर गरम करा. कुकी शीटवर तुपाचा हात लावून सर्व बोटी ठेवा. ८ मिनिटं किंवा कडा तपकीरी होईपर्यंत भाजा. बाहेर काढून गार व्हायला ठेवा.

प्रत्येक बोटीत वरील मिश्रण (२ चमचे) घालून वर बदामाचे तुकडे, भाजलेल्या खोबर्‍याचा किस भुरभुरावा. पाहिजे तर व्हिप्ड क्रिम घालू शकता. बोटी थिजू न देण्यासाठी लगेच खा :-)

टीप:
  • आंबटपणा नुसार अननसाचा रस कमी जास्त करु शकता तसंच कंडेंन्स्ड मिल्कचाही. 
  • टॉरटीयाच्या १ पॅकमध्ये १२ असतात. मिश्रण उरलं तर फ्रिजरमध्ये ३ आठवडे राहतं.







Saturday, November 28, 2015

रवा आणि कणिक लाडू

साहित्य:
३ वाट्या रवा
२ वाट्या गहू पीठ/कणिक
 १ कप तूप/ चित्रात दाखवलेल्या २ कांड्या
१ वाटी साखर
१ चमचा वेलदोड्याची पूड
चिमूटभर मीठ

कृती:
रवा आणि कणीक पाव कप तूपात मंद आचेवर हलका तपकिरी रंग येईपर्यत भाजा (साधारण १५ मिनिटं)
गार झाल्यावर साखर घालून एकत्र करा. साखर एकदम न घालता थोडी थोडी घातली तर गोडाचा अंदाज येईल. मी करते ते फार गोड करत नाही.
मीठ आणि वेलदोडे पावडर घालून मिश्रण चांगलं मिसळून घ्या.
पातळ तूप घालून लाडू वळा. साधारण छोट्या आकाराचे ४५ लाडू होतात.

सूचना: तूप घालताना मी भाजलेलं मिश्रण थोडं वेगळं घेऊन त्यात थोडसं तूप घालून लाडू करते. उरलेलं रवा, कणिक आणि साखर घातलेलं मिश्रण बंद डब्यात ठेवून देते. त्यामुळे कधीही आयत्यावेळी पटकन थोडेसे लाडू करता येतात.




Wednesday, December 17, 2014

ओटमिल वड्या

साहित्य:
३/४  वाटी तूप (बटर - शेंगदाणे, तीळ, बदाम किंवा कोणतंही)
१/२ वाटी मध
३ वाट्या ओटमिल (सिरीयल) 

कृती:
ओटमिल (सिरीयल) भाजून घ्या. (हलका तपकिरी रंग येईपर्यंत)
भाड्यांत तूप आणि मध एकत्र गरम करा
भाजलेले ओट त्यात मिसळा
चिमुटभर मीठ घाला
सुका मेवा (बदाम, पिकॅन, खजूर) पाहिजे असेल तर घाला.
मिश्रण सपाट भाड्यांत पसरा.
फ्रिज मध्ये २ तास ठेवा.
वड्या कापा.

साधारण २० वड्या तयार होतात.






Saturday, December 6, 2014

खांडवी - कोकणातील गोड पदार्थ

साहित्य:
तांदूळ कण्या/रवा - २ वाट्या (कण्या नसतील तर तांदूळ धुवून सुकवायचे व नंतर मिक्सरमध्ये रवाळ
(जाडेभरडे) करायचे.)
गुळ: १ वाटी
पाणी: ४ वाट्या
तूप: ४ चमचे
मीठ : चिमुटभर
ओलं खोबरं : वड्यांवर घालण्यापुरतं, अंदाजे ४ चमचे

कृती:
  • तांदूळ कण्या न मिळाल्यास तांदूळ धुवून वाळवून घ्यावेत व मिक्सरमधून कण्या राहतील इतपत बारीक करावेत.
  • तूपावर लालसर रंग येईपर्यंत तांदूळ रवा भाजावा
  • पाणी उकळायला ठेवावे. उकळी फुटल्यावर गुळ घालून विरघळू द्यावा.
  • भाजलेला तांदूळ रवा टाकावा. एक दोन वाफा येऊ द्याव्यात. गोळा होईल असा शिजवून घ्यावा.
  • ताटाला किंवा ओट्यावर तूपाचा हात फिरवावा
  • ओलं खोबरं भुरभुरावं
  • त्यावर शिजत असलेला गरम गरम गोळा घालावा व हलक्या हाताने गोळा पसरावा. (हात न भाजू देण्याची काळजी घ्यावी.)
  • वरती पुन्हा ओलं खोबरं भुरभुरावं.
  • थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

    साधारण ३० ते ३५ वड्या होतात.





Tuesday, August 26, 2014

पातोळे

हा बहुधा सारस्वती पदार्थ आहे. पण कोकणात सर्वत्र केला जातो.

साहित्य:
१ काकडी मध्यम आकाराची किसून
३/४ वाटी तांदूळ पीठ
१/२ वाटी गुळ
२ चमचे रवा
१ चमचा तेल किंवा तूप
चिमूटभर मीठ
हळदीची पानं ७-८

कृती:
काकडी सालं काढून किसून घ्या.
किसलेली काकडी आणि गुळ, तेल/तूप एकत्र गरम करायला ठेवा.
कढ आल्यावर रवा आणि मीठ घाला.
दोन वाफा येऊ द्या.
शिजलेले मिश्रण गार होऊ द्या.
हळदीची पानं उलटी करुन त्यावर अर्ध्या भागात छोटे छोटे गोळे थापा.
उरलेल्या अर्ध्या बाजूने पातोळा झाका.
इडली पात्रात किंवा कुकरच्या भाड्यांत (शिटी न लावता) घालून १५ मिनिटं वाफवा.
गार झाल्यावर तुपाबरोबर पातोळे खावेत. (हळदीचं पान खाऊ नये :-).

टीप: हळदीची  पानं नसतील तर केळीची वापरता येतात. ती देखील नसतील तर पार्शमेंट पेपरचा वापर करावा.