Friday, October 25, 2013

आंबा इडली


साहित्य:
१.५ कप रवा किंचित भाजून
१/४ कप तांदूळ कण्या (तांदूळ मिक्सरमधून काढले तरी चालतात कण्या नसतील तर. तांदूळ धुऊन वाळवून घेतले तर उत्तम पण नाही केलं तसं तरी काही फरक पडत नाही.)
२ कप आंब्याचा रस
१कप दही
१ कप दूध
७ चमचे साखर
१ चमचा वेलची पावडर
१ चमचा तूप
   चिमूटभर मीठ
१/२ चमचा बेंकिंग सोडा

कृती:
सर्व साहित्य एकत्र करुन इडली पात्रात १५ मिनिटं वाफवा. वाफ पूर्ण गेल्यानंतर इडल्या काढा. तूपाबरोबर गोड इडल्यांचा आस्वाद घ्यावा.

Friday, October 11, 2013

भाजलेली (बेक्ड) पिनव्हिल सॅडविचेस

साहित्य:
२ काद्यांच्या पाती बारिक चिरुन
१ मध्यम आकाराची पिवळी भोपळी मिरची (बेल पेपर)
8 oz चीज
क्रेसंट शीट (Crescent)

कृती:
बारिक चिरलेली कांदा पात आणि भोपळी मिरची एकत्र करा.
क्रेसंट शीट (Crescent) मधील एक पुंगळी काढून त्याचे चार आयताकृती तुकडे कापा.
प्रत्येक तुकड्यावर चीज पसरा
त्यावर कांदा पात आणि भोपळी मिरचीचं मिश्रण भुरभुरवा.
गुंडाळी करा.
प्रत्येक तुकड्याचे पाच ते सहा गोल काप करा.
ओव्हनमध्ये ३५० डिग्रीवर १३ ते १५ मिनिटं भाजा.



Monday, September 2, 2013

तिरामिसू

तिरामिसू (पारंपारिक तिरामिसूपेक्षा  वेगळं व मुलं करु शकतील असं.)

तिरामिसू हा गोड पदार्थ मास्करपोन चीज आणि लेडीफिंगर्स किंवा पौंड केक वापरुन नेहमी करतात. पण मुलांना करता येईल अशी ही पाककृती आहे. माझ्या ९ वर्षाच्या मुलीने केलेली.

साहित्य:
इन्स्टंट कॉफी - ६ चमचे
कॉफी लिकर किंवा कलुवा - २ चमचे (हे अल्कोहोल आहे. नाही वापरलं तरी चालेल पण त्यामुळा वेगळा स्वाद येतो.)
पौंड केक - ६ आयताकृती तुकडे (स्लाइस)
रिकोटा चीज - १/२ कप
क्रिम चीज - १/४ कप
सावर क्रिम - १/४ कप
साखर - २ चमचे
व्हिप क्रिम - १ कप
डार्क चॉकलेट - सजावटीसाठी

कृती:
पाणी घालून एक मोठा मग कॉफी तयार करा आणि कलुवा/कॉफी लिकर  त्यात घालून  एकत्र करा. गार होऊ द्या.
केकच्या एका तुकड्याचे चार तुकडे करा.
तुकडे शोभिवंत ग्लास/बाऊल मध्ये ठेवा
त्यावर   प्रत्येक तुकडा नीट बुडेल इतके  कॉफी मिश्रण घाला.
रिकोटा चीज चमच्याने प्रत्येक तुकड्यावर घाला
क्रिम चीज, सावर क्रिम, साखर नीट एकत्र करा. व्हिप क्रिममध्ये मिसळा. हे मिश्रण बाऊलमधील रिकोटा चीजवर घाला
कमीत कमी अर्धा तास किंवा चोवीस तास फ्रिजमध्ये ठेवा.
वर डार्क चॉकलेट किसून घाला आणि तिरामिसूचा आस्वाद घ्या.

Saturday, August 10, 2013

पफ पेस्ट्री ((भाजलेला सामोसा))

अगदी सोपा आणि तळकट टाळून सामोसा खाल्ल्याचं समाधान देणारा हा भाजलेला पदार्थ आहे.

साहित्य:
१ पफ पेस्ट्री पॅक - पाकिटातील दोन्ही आयताकृती पट्ट्या (शीटस)
५  बटाटे  -  (मध्यम आकार)
१ मुठभर - मटार (फ्रोझन)  
२ चमचे - तेल
 १ चमचा - गरम मसाला
१/४  चमचा - मीठ
आलं - छोटा तुकडा बारीक चिरुन
कोथींबीर - बारीक चिरुन स्वादापुरती
१/२ चमचा लिंबू  रस
फोडणीचे साहित्य : हळद, हिंग, जिरं, मोहरी

कृती:
बटाटे मायकोव्हेव मध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर साल काढून बारीक चिरा.
तेल गरम करुन फोडणी तयार करा. आलं टाका, नंतर मटार घालून जरा परता. शिजतानाच जरा डावाने दाबून चेचल्यासारखं करा.
बारिक चिरलेले बटाटे घाला. चवीप्रमाने मीठ, लिंबू, कोथींबीर घालून परता.
हे मिश्रण गार होऊ द्या.

पेस्ट्री:
पाकिटावरील सूचनेप्रमाणे बाहेर काढून ठेवा.
बाहेर काढल्यावर धारदार सुरीने पट्ट्या वेगळ्या करा. थोडशी कणीक किंवा मैदा भुरभुरवून पट्टी लाटण्याने थोडशी  लाटून घ्या.
दोन्ही पट्ट्याचे १६-२० चौकोनी तुकडे कापा.
प्रत्येक तुकड्यावर भाजीचे गार झालेले मिश्रण एका बाजूला एक ते दोन मोठे चमचे घाला आणि मग दुसर्‍या बाजूने बंद करा.
पार्शमेंट पेपरवर हे सारे तुकडे ठेवा आणि ३५० डिग्रीवर ओव्हनमध्ये ३० मिनिटं किंवा लालसर रंग येईपर्यंत बेक करा. १५ मिनिटांनी परतून दुसरी बाजू वर करायला विसरु नका.
१६ ते २० सामोसे तयार होतात.

केचप किंवा चटणी बरोबर आस्वाद घ्या.

Friday, June 28, 2013

रुगुला आणि बेजिल (तुळस) पेस्तो (चटणी) सॅडविच

साहित्य:
७-८ - बदाम
५ औंस - रुगुला   ( ग्रोसरी स्टोअर्समध्ये प्रोड्युस भागात)
बेजिल किंवा पेस्ट - ( ग्रोसरी स्टोअर्समध्ये प्रोड्युस भागात ट्युबमध्ये किंवा ताजी)
३ - लसूण पाकळ्या
३ औंस - पारमेसान चीज
२ चमचे - लिंबू रस 
 ३ औंस  - ग्रीक योगर्ट 
१ चमचा - मीठ 
१ चमचा - मिरी पावडर 

(सव्वा कप चटणी/पेस्तो तयार होतो.)

१  - भाजलेली लाल भोपळी मिरची 
१  - भाजलेली पिवळी भोपळी मिरची 
१/२ कप - कांद्याच्या चकत्या  
१ कप - भाजलेले मशरुम 
१/२ चमचा - मिरी पावडर 
८ - स्वीस चीज चकत्या 
१ - फ्रेंच ब्रेड - ३ सारखे तुकडे मधोमध कापून किंवा सिबॅटा रोल्स (हे चौकोनी आकारात कापलेले असतात आणि फ्रेंच ब्रेडपेक्षा चव चांगली लागते.)

पेस्तो/ चटणी कृती:
बदाम मंध्यम आचेवर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. फूड प्रोसेसरमध्ये बेजिल, रुगुला, लसूण, चीज, लिंबू रस, योगर्ट आणि भाजलेले बदाम घालून एकसंध मिश्रण तयार करा. मीठ, मिरी पावडर घालून मिसळा.

सॅडविच कृती:
ब्रेडला ऑलिव्ह ऑईल लावून ओव्हनमध्ये  १ - १ मिनिटं खालून वरुन, दोन्ही बाजूनी ग्रील करा
बाहेर काढून कापलेल्या ब्रेडवर १ ते २ चमचा दोन्ही बाजूला  पेस्तो पसरा
भोपळी मिरची, कांदा, मशरुम मिश्रण एका बाजूवर पसरा
दोन्ही किंवा एका बाजूवर स्वीस चीजची एक चकती घाला
ब्रेड ओव्हनमध्ये घालून चीज पातळ ग्रील करा. (दोन ते तीन मिनिटं) ग्रील करताना ब्रेड जळणार नाही यासाठी लक्ष ठेवावं लागतं.
बाहेर काढून गरम गरम सॅडविचचा आस्वाद घ्या.

भाज्यांच्या ऐवजी चिकन वापरुनही चांगले लागते. चिकन वापरल्यास तुकडे शिजवून घेऊन भाज्यांच्या जागी किंवा भाज्यांबरोबर वापरु शकता.












Thursday, June 27, 2013

बटाटा आणि राजमा (रेड बीन्स) एनचिलाडा


साहित्य:
३ ते ४ - बटाटे  -
१ - राजमा / रेड बीन्स कॅन  (१४ औंस)
१/४ कप - किसलेले चीज
१ चमचा  - गरम मसाला/चाट किंवा पावभाजी मसाला -  
८-१२ - टॉरटिया

१ कप - व्हेजीटेबल स्टॉक
१ कप - टॉमटे ज्यूस
१ चमचा - लिंबू रस  
१ चमचा - मीठ 
१ चमचा - तिखट  
२ चमचे - तेल 
१  - चिरलेला कांदा  
२ - लसूण पाकळ्या 
२ चमचे - कॉर्न स्टार्च
१ चमचा - चिरलेली कोथींबीर 

कृती:-
तेल गरम करुन चिरलेला कांदा त्यात परता, बारीक केलेली लसूण, जिरं पावडर आणि  चवीनूसार तिखट घाला.
थोडं परतून व्हेजिटेबल स्टॉक आणि टॉमेटो ज्यूस घाला. पाच मिनिटं मध्यम आचेवर उकळा.
कॉर्न स्टार्च थोड्याशा पाण्यात विरघळवून वरील मिश्रणात घाला. ढवळत रहा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करा.  थंड होऊ द्या.

बटाटे मायक्रोव्हेवमध्ये उकडून गार झाले की  सालं न काढता बारीक फोडी करा. (सॉस करत असतानाच बटाटे शिजवून घेऊ शकता)
कॅनमधले बीन्स (पाणी काढून टाका. ते वरच्या सॉसमध्ये वापरलं तरी चालेल), बटाट्याच्या फोडी, आणि निम्मं चीज एकत्र करा
मीठ, लिंबू रस, मसाला, कोथींबीर घालून मिश्रण तयार करा

बेकींग ट्रे त तेलाचा हात फिरवा किंवा स्प्रे ने सर्वत्र तेल शिडकवा
प्रत्येक टॉरटिया वर वरिल मिश्रण १ ते २ चमचे घालून एक चमचा सॉस घाला, डोशासारखी गुंडाळी करा
या क्रमाने बेकिंग डिश मध्ये मिश्रण भरलेले सर्व टॉरटिया लावा
वरती उरलेलं सर्व सॉस आणि चीज पसरा
३५० वर ३० ते ३५ मिनिटं बेक करा.

खाताना सावर क्रिम किंवा आणि गॉकोमॉले (Guacamole) वर घालून घ्या. खालील चित्रात चारच टॉरटिया दिसत आहेत कारण मी मोठ्या आकाराचे वापरले आहेत. छोटे घेतले तर ८ - १२  होतात. ट्रे छोटा असेल तर एकावर एक ठेवले तरी चालतात.