Friday, October 25, 2013

आंबा इडली


साहित्य:
१.५ कप रवा किंचित भाजून
१/४ कप तांदूळ कण्या (तांदूळ मिक्सरमधून काढले तरी चालतात कण्या नसतील तर. तांदूळ धुऊन वाळवून घेतले तर उत्तम पण नाही केलं तसं तरी काही फरक पडत नाही.)
२ कप आंब्याचा रस
१कप दही
१ कप दूध
७ चमचे साखर
१ चमचा वेलची पावडर
१ चमचा तूप
   चिमूटभर मीठ
१/२ चमचा बेंकिंग सोडा

कृती:
सर्व साहित्य एकत्र करुन इडली पात्रात १५ मिनिटं वाफवा. वाफ पूर्ण गेल्यानंतर इडल्या काढा. तूपाबरोबर गोड इडल्यांचा आस्वाद घ्यावा.

Friday, October 11, 2013

भाजलेली (बेक्ड) पिनव्हिल सॅडविचेस

साहित्य:
२ काद्यांच्या पाती बारिक चिरुन
१ मध्यम आकाराची पिवळी भोपळी मिरची (बेल पेपर)
8 oz चीज
क्रेसंट शीट (Crescent)

कृती:
बारिक चिरलेली कांदा पात आणि भोपळी मिरची एकत्र करा.
क्रेसंट शीट (Crescent) मधील एक पुंगळी काढून त्याचे चार आयताकृती तुकडे कापा.
प्रत्येक तुकड्यावर चीज पसरा
त्यावर कांदा पात आणि भोपळी मिरचीचं मिश्रण भुरभुरवा.
गुंडाळी करा.
प्रत्येक तुकड्याचे पाच ते सहा गोल काप करा.
ओव्हनमध्ये ३५० डिग्रीवर १३ ते १५ मिनिटं भाजा.