हा बहुधा सारस्वती पदार्थ आहे. पण कोकणात सर्वत्र केला जातो.
साहित्य:
१ काकडी मध्यम आकाराची किसून
३/४ वाटी तांदूळ पीठ
१/२ वाटी गुळ
२ चमचे रवा
१ चमचा तेल किंवा तूप
चिमूटभर मीठ
हळदीची पानं ७-८
कृती:
काकडी सालं काढून किसून घ्या.
किसलेली काकडी आणि गुळ, तेल/तूप एकत्र गरम करायला ठेवा.
कढ आल्यावर रवा आणि मीठ घाला.
दोन वाफा येऊ द्या.
शिजलेले मिश्रण गार होऊ द्या.
हळदीची पानं उलटी करुन त्यावर अर्ध्या भागात छोटे छोटे गोळे थापा.
उरलेल्या अर्ध्या बाजूने पातोळा झाका.
इडली पात्रात किंवा कुकरच्या भाड्यांत (शिटी न लावता) घालून १५ मिनिटं वाफवा.
गार झाल्यावर तुपाबरोबर पातोळे खावेत. (हळदीचं पान खाऊ नये :-).
टीप: हळदीची पानं नसतील तर केळीची वापरता येतात. ती देखील नसतील तर पार्शमेंट पेपरचा वापर करावा.

|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|