साहित्य:
३/४ कप नारळाचं दुध (मी कॅन मधलं वापरलं आहे)
१/२ कप कंडेंन्स्ड मिल्क
१/२ कप अननस रस
१/४ चमचा मीठ
२ चमचे कॉर्नस्टार्च
१ अंड्यातील पिवळा बलक
२ चमचे तूप
१ पॅक टॅको बोट्स टॉरटिया
१ कप व्हिप्ड क्रिम (ऐच्छीक)
१ चमचा बदाम, भाजलेलं सुकं खोबरं
कृती:
नारळाचं दुध, कंडेंन्स्ड मिल्क, अननस रस, कॉर्नस्टार्च, मीठ आणि बलक (फेटून) एकत्र करुन मध्यम गॅसवर उकळवा. उकळवताना सतत ढवळत रहा. साधारण ३-४ मिनिटं लागतात. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करा. किंचित गार झाल्यावर ढवळून फ्रिजमध्ये कमीत कमी २ तास ठेवा.
ओव्हन 375°F. वर गरम करा. कुकी शीटवर तुपाचा हात लावून सर्व बोटी ठेवा. ८ मिनिटं किंवा कडा तपकीरी होईपर्यंत भाजा. बाहेर काढून गार व्हायला ठेवा.
प्रत्येक बोटीत वरील मिश्रण (२ चमचे) घालून वर बदामाचे तुकडे, भाजलेल्या खोबर्याचा किस भुरभुरावा. पाहिजे तर व्हिप्ड क्रिम घालू शकता. बोटी थिजू न देण्यासाठी लगेच खा :-)
टीप:

- आंबटपणा नुसार अननसाचा रस कमी जास्त करु शकता तसंच कंडेंन्स्ड मिल्कचाही.
- टॉरटीयाच्या १ पॅकमध्ये १२ असतात. मिश्रण उरलं तर फ्रिजरमध्ये ३ आठवडे राहतं.
|
|
---|---|
|
|
|
|
करुनच दिलस तर अगदिच आवडेल !
ReplyDelete