Saturday, November 28, 2015

रवा आणि कणिक लाडू

साहित्य:
३ वाट्या रवा
२ वाट्या गहू पीठ/कणिक
 १ कप तूप/ चित्रात दाखवलेल्या २ कांड्या
१ वाटी साखर
१ चमचा वेलदोड्याची पूड
चिमूटभर मीठ

कृती:
रवा आणि कणीक पाव कप तूपात मंद आचेवर हलका तपकिरी रंग येईपर्यत भाजा (साधारण १५ मिनिटं)
गार झाल्यावर साखर घालून एकत्र करा. साखर एकदम न घालता थोडी थोडी घातली तर गोडाचा अंदाज येईल. मी करते ते फार गोड करत नाही.
मीठ आणि वेलदोडे पावडर घालून मिश्रण चांगलं मिसळून घ्या.
पातळ तूप घालून लाडू वळा. साधारण छोट्या आकाराचे ४५ लाडू होतात.

सूचना: तूप घालताना मी भाजलेलं मिश्रण थोडं वेगळं घेऊन त्यात थोडसं तूप घालून लाडू करते. उरलेलं रवा, कणिक आणि साखर घातलेलं मिश्रण बंद डब्यात ठेवून देते. त्यामुळे कधीही आयत्यावेळी पटकन थोडेसे लाडू करता येतात.




No comments:

Post a Comment

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.