कॅलझोन - पिझ्झाच्या पीठा (डोव) मध्ये सारण भरुन करंजीच्या आकारात ओव्हनमध्ये भाजतात.
नेहमीच्या कॅलझोन मध्ये चीज, हॅम अशा गोष्टीचं सारण असतं. ही पाककृती उकडलेल्या बटाट्याची भाजी भरुन केलेली आहे.
साहित्य:
१६ औंस पिझ्झा पिठाचा गोळा (कोणत्याही ग्रोसरी स्टोअर्स मध्ये मिळतो) पिझ्झा पीठ (डोव) कॅलझोन करण्यापूर्वी फ्रिजमधून अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवा.
३/४ कप मॅगी सॉस/केचप/हिरवी चटणी
४ बटाटे
२ चमचे तेल
फोडणीचं साहित्य (हिंग, हळद, मोहरी)
१ कप किसलेले (shredded Mozzarella) चीज
१ ते २ चमचे कोथींबीर
२ चमचे मैदा
कृती:
बटाटा भाजी:
बटाटे मायक्रोव्हेव मध्ये उकडून घ्या. गार झाले की सालं काढून बारीक फोडी करा.
तेल गरम करुन हिंग, हळद, चिमुटभर तिखट, मोहरी टाकून फोडणी करा.
उकडलेल्या बटाट्याच्या फोडी मीठ, लिंबू, कोथींबीर टाकून परता. भाजी गार होऊ द्या.
कॅलझोन:
450°F वर ओव्हन गरम करा. ओव्हन गरम होईपर्यत बाकीच्या तयारीला लागा.
ओट्यावर १ चमचा मैदा भुरभुरवा. उरलेल्या मैद्यात पिझ्झा पीठ घोळवून घ्या. तो गोळा लाटण्याने/हाताने आयताकृती पसरवा.
पसरलेल्या पिझ्झा पीठावर चारी बाजून दुमडण्यासाठी जागा ठेवून सॉस/ केचप/ चटणी पसरा.
त्यानंतर त्यावर बटाट्याची भाजी पसरुन, चीज पसरा.
गुंडाळून गोल करा. चारी बाजू पाण्याचं बोट फिरवून (बोट पाण्यात बुडवून) व्यवस्थित बंद करा. (पराठ्यांसाठी करतो त्याप्रमाणे).
बेकिंग ट्रे ला तेलाचा हात फिरवून त्यात ही गुंडाळी ठेवा. गुंडाळी ठेवल्यावर त्यावरही तेलाचा हात फिरवा (ऐच्छिक)
ओव्हनमध्ये १५ मिनिटं भाजा.
बाहेर काढल्यावर किचिंत गार झाल्यावर धारदार सुरीने कापा. साधारण ८ तुकडे तयार होतात.

|
|
---|---|
|
|
|
|
No comments:
Post a Comment
नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.