Friday, May 9, 2014

ग्रॅम क्रॅक्रर्स केक

सोपा आणि न भाजता केलेला ग्रॅम क्रॅक्रर्स केक.

साहित्य:
२ (३.४ औंस) व्हॅनिला इन्स्टंट पुडींग पावडर पाकिटं
३.५ कप दूध
१२ औंस कुल व्हिप
२ (१४.४) औंस ची ग्रॅम क्रॅकर्सची पाकिटं

फ्रॉस्टींग
६ चमचे तूप (butter)
६ चमचे दूध
६ चमचे कोको पावडर
१/४ कप साखर

कृती:
दूध, व्हॅनिला पुडींग पावडर एकत्र करा. ते मिश्रण कुल व्हिप मध्ये घालून  व्यवस्थित ढवळा.

पसरट भाड्यांत (ट्रे) ग्रॅम क्रॅकर्स पसरा. (तळ झाकण्यासाठी तुकडे  तुकडे करावे लागतील.)
त्यावर वरील पुडींग, कुलव्हिप मिश्रणातील पाव भाग पसरा
सर्वात वर ग्रॅम क्रॅकर्स येईपर्यंत क्रॅकर्स, पुडींग कुलव्हिप चं मिश्रण वापरा.

फ्रॉस्टींग:
दूध आणि तूप मायक्रोव्हेवमध्ये ४५ सेंकद गरम करा. (दोन्ही मिळून येण्यापुरतं)
त्यात कोको पावडर आणि साखर घालून व्यवस्थित ढवळा.
केकवर पसरा आणि रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.











2 comments:

  1. मोहना प्रत्येक पदार्थच इतका tempting दिसतो या ब्लॉगवरचा! पण काही काही गोष्टी इथे मिळत नाहीत कदाचित किंवा माझ्या नजरेस त्या पडल्या नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. हम्म...पर्यायी काय वापरता येईल ते पण लिहित जाईन यापुढे. जसं या केकमध्ये मारी बिस्किटं वापरता येतील. तुला कोणती पाककृती करायची असेल ते लिहलंस आणि काय मिळत नाही ते तर मला सांगत येईल त्याऐवजी काय वापरता येईल ते.

      Delete

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.