Thursday, April 17, 2014

वोनटोन रॅप्स

साहित्य:
१२ औंसचं वोनटोन रॅप्सचं पाकिट (ग्रोसरी स्टोअर्स)
१ कप उभी पातळ चिरलेली कोबी (लहान कोबीचा अर्धा गड्डा)
१/४ कप किसलेलं गाजर (१ - २ गाजरं)
२ कांद्याच्या पाती चिरुन
१ उभी पातळ चिरलेली भोपळी मिरची. (लाल, हिरवी किंवा पिवळी)
थोडीशी कोथींबीर चिरुन
२ चमचे तिळाचं किंवा नेहमीचं तेल
१/२ इंच आलं बारीक चिरुन
१ पाकळी लसूण बारीक चिरुन (ऐच्छीक)
१ चमचा चिली सॉस
१ चमचा सोया सॉस (ऐच्छीक)
१ चमचा पाणी

कृती:
प्रत्येक वेळेला अर्धा अर्धा चमचा तेल मध्यम आचेवर गरम करुन कोबी, गाजर, कांद्याची पात, भोपळी मिरची एकेक करुन २ ते ३ मिनिटं परता. भाज्या थोड्या कच्याच ठेवा. पूर्ण शिजवू नका. आलं, लसूण, चिली सॉस, सोयासॉस परतून घ्या आणि भाज्यांमध्ये मिसळा. मिश्रण थंड होवू द्या.

ओव्हन ४००° वर गरम करा.
वोनटोन रॅप्स पाकिटातून एकेक करुन काढा.
१ चमचा मिश्रण मध्यांवर पसरा.
पाण्यात बोट बुडवून कडांवरुन फिरवा आणि दुसर्‍या बाजूने बंद करा (त्रिकोणी आकार).
एकेक रॅप बेकिंग ट्रे मध्ये ठेवा. रॅप्स सुकू नयेत यासाठी ओला फडका टाकायला विसरु नका.
शेवटी सर्व रॅप्सवरुन तेलाचा हात दोन्हीबाजूनी फिरवा किंवा स्प्रे वापरा.
गरम झालेल्या ओव्हनमध्ये १० ते १२ मिनिटं किंवा हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजा.

चटणी, केचप किंवा हॉट सॉस बरोबर आस्वाद घ्या.







No comments:

Post a Comment

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.