Monday, September 2, 2013

तिरामिसू

तिरामिसू (पारंपारिक तिरामिसूपेक्षा  वेगळं व मुलं करु शकतील असं.)

तिरामिसू हा गोड पदार्थ मास्करपोन चीज आणि लेडीफिंगर्स किंवा पौंड केक वापरुन नेहमी करतात. पण मुलांना करता येईल अशी ही पाककृती आहे. माझ्या ९ वर्षाच्या मुलीने केलेली.

साहित्य:
इन्स्टंट कॉफी - ६ चमचे
कॉफी लिकर किंवा कलुवा - २ चमचे (हे अल्कोहोल आहे. नाही वापरलं तरी चालेल पण त्यामुळा वेगळा स्वाद येतो.)
पौंड केक - ६ आयताकृती तुकडे (स्लाइस)
रिकोटा चीज - १/२ कप
क्रिम चीज - १/४ कप
सावर क्रिम - १/४ कप
साखर - २ चमचे
व्हिप क्रिम - १ कप
डार्क चॉकलेट - सजावटीसाठी

कृती:
पाणी घालून एक मोठा मग कॉफी तयार करा आणि कलुवा/कॉफी लिकर  त्यात घालून  एकत्र करा. गार होऊ द्या.
केकच्या एका तुकड्याचे चार तुकडे करा.
तुकडे शोभिवंत ग्लास/बाऊल मध्ये ठेवा
त्यावर   प्रत्येक तुकडा नीट बुडेल इतके  कॉफी मिश्रण घाला.
रिकोटा चीज चमच्याने प्रत्येक तुकड्यावर घाला
क्रिम चीज, सावर क्रिम, साखर नीट एकत्र करा. व्हिप क्रिममध्ये मिसळा. हे मिश्रण बाऊलमधील रिकोटा चीजवर घाला
कमीत कमी अर्धा तास किंवा चोवीस तास फ्रिजमध्ये ठेवा.
वर डार्क चॉकलेट किसून घाला आणि तिरामिसूचा आस्वाद घ्या.

No comments:

Post a Comment

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.