अगदी सोपा आणि तळकट टाळून सामोसा खाल्ल्याचं समाधान देणारा हा भाजलेला पदार्थ आहे.
साहित्य:
१ पफ पेस्ट्री पॅक - पाकिटातील दोन्ही आयताकृती पट्ट्या (शीटस)
५ बटाटे - (मध्यम आकार)
१ मुठभर - मटार (फ्रोझन)
२ चमचे - तेल
१ चमचा - गरम मसाला
१/४ चमचा - मीठ
आलं - छोटा तुकडा बारीक चिरुन
कोथींबीर - बारीक चिरुन स्वादापुरती
१/२ चमचा लिंबू रस
फोडणीचे साहित्य : हळद, हिंग, जिरं, मोहरी
कृती:
बटाटे मायकोव्हेव मध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर साल काढून बारीक चिरा.
तेल गरम करुन फोडणी तयार करा. आलं टाका, नंतर मटार घालून जरा परता. शिजतानाच जरा डावाने दाबून चेचल्यासारखं करा.
बारिक चिरलेले बटाटे घाला. चवीप्रमाने मीठ, लिंबू, कोथींबीर घालून परता.
हे मिश्रण गार होऊ द्या.
पेस्ट्री:
पाकिटावरील सूचनेप्रमाणे बाहेर काढून ठेवा.
बाहेर काढल्यावर धारदार सुरीने पट्ट्या वेगळ्या करा. थोडशी कणीक किंवा मैदा भुरभुरवून पट्टी लाटण्याने थोडशी लाटून घ्या.
दोन्ही पट्ट्याचे १६-२० चौकोनी तुकडे कापा.
प्रत्येक तुकड्यावर भाजीचे गार झालेले मिश्रण एका बाजूला एक ते दोन मोठे चमचे घाला आणि मग दुसर्या बाजूने बंद करा.
पार्शमेंट पेपरवर हे सारे तुकडे ठेवा आणि ३५० डिग्रीवर ओव्हनमध्ये ३० मिनिटं किंवा लालसर रंग येईपर्यंत बेक करा. १५ मिनिटांनी परतून दुसरी बाजू वर करायला विसरु नका.
१६ ते २० सामोसे तयार होतात.
केचप किंवा चटणी बरोबर आस्वाद घ्या.

No comments:
Post a Comment
नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.