Thursday, June 27, 2013

बटाटा आणि राजमा (रेड बीन्स) एनचिलाडा


साहित्य:
३ ते ४ - बटाटे  -
१ - राजमा / रेड बीन्स कॅन  (१४ औंस)
१/४ कप - किसलेले चीज
१ चमचा  - गरम मसाला/चाट किंवा पावभाजी मसाला -  
८-१२ - टॉरटिया

१ कप - व्हेजीटेबल स्टॉक
१ कप - टॉमटे ज्यूस
१ चमचा - लिंबू रस  
१ चमचा - मीठ 
१ चमचा - तिखट  
२ चमचे - तेल 
१  - चिरलेला कांदा  
२ - लसूण पाकळ्या 
२ चमचे - कॉर्न स्टार्च
१ चमचा - चिरलेली कोथींबीर 

कृती:-
तेल गरम करुन चिरलेला कांदा त्यात परता, बारीक केलेली लसूण, जिरं पावडर आणि  चवीनूसार तिखट घाला.
थोडं परतून व्हेजिटेबल स्टॉक आणि टॉमेटो ज्यूस घाला. पाच मिनिटं मध्यम आचेवर उकळा.
कॉर्न स्टार्च थोड्याशा पाण्यात विरघळवून वरील मिश्रणात घाला. ढवळत रहा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करा.  थंड होऊ द्या.

बटाटे मायक्रोव्हेवमध्ये उकडून गार झाले की  सालं न काढता बारीक फोडी करा. (सॉस करत असतानाच बटाटे शिजवून घेऊ शकता)
कॅनमधले बीन्स (पाणी काढून टाका. ते वरच्या सॉसमध्ये वापरलं तरी चालेल), बटाट्याच्या फोडी, आणि निम्मं चीज एकत्र करा
मीठ, लिंबू रस, मसाला, कोथींबीर घालून मिश्रण तयार करा

बेकींग ट्रे त तेलाचा हात फिरवा किंवा स्प्रे ने सर्वत्र तेल शिडकवा
प्रत्येक टॉरटिया वर वरिल मिश्रण १ ते २ चमचे घालून एक चमचा सॉस घाला, डोशासारखी गुंडाळी करा
या क्रमाने बेकिंग डिश मध्ये मिश्रण भरलेले सर्व टॉरटिया लावा
वरती उरलेलं सर्व सॉस आणि चीज पसरा
३५० वर ३० ते ३५ मिनिटं बेक करा.

खाताना सावर क्रिम किंवा आणि गॉकोमॉले (Guacamole) वर घालून घ्या. खालील चित्रात चारच टॉरटिया दिसत आहेत कारण मी मोठ्या आकाराचे वापरले आहेत. छोटे घेतले तर ८ - १२  होतात. ट्रे छोटा असेल तर एकावर एक ठेवले तरी चालतात.














No comments:

Post a Comment

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.