१ - पास्ता पाकिट
१ - डबा (कॅन) क्रिम ऑफ मशरुम सॉस
किसलेलं (श्रेडेड) चीज भुरभुरवून टाकण्यासाठी
७-८ - मशरुम चिरुन, ब्रोकोलीची फुलं मुठभर, १ भोपळी मिरची उभट चिरुन किंवा
१ कप - कोणत्याही फ्रोझन भाज्या
कृती:
पास्ता उकळत्या पाण्यात घालून ९ ते १२ मिनिटं किंवा मऊसर होईपर्यंत शिजवा किंवा पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे
चाळणीतून गाळा आणि गार पाण्याखाली धरा. पाणी निथळून घ्या.
पातेल्यात एक चमचा तेल गरम करुन चिरलेल्या भाज्या दोन मिनिटं परता त्यात कॅनमधील अर्ध मशरुम सॉस थोडं पाणी घालून घाला. चवीपुरते मीठ घालून सगळं नीट परता आणि पास्ता घालून चांगला गरम करा. यामध्ये भारतीय चव आणायची असेल तर चाट मसाला, पाव भाजी मसाला एक चमचा घातला तर चांगला लागतो.
बेंकिंग ट्रे मध्ये वर तयार झालेलं मिश्रण पसरा. किसलेले चीज त्यावर पसरा. ओव्हन ब्रॉईलवर लावा. पास्ता असलेला बेकिंग ट्रे ब्रॉयलरखाली तीन ते चार मिनिटं ठेवा.
बाहेर काढून गरम गरम खा.
|
|
kool..
ReplyDeleteplease visit: http://hindustanisakhisaheli.blogspot.com/