Monday, April 15, 2013

ॲपल सॉसचं पन्हं

कैरीऐवजी ॲपल सॉस वापरलं आहे हे मुद्दाम सांगितल्याशिवाय या पन्ह्यात  कळत नाही

साहित्य: 
 ४८ औंस ॲपल सॉस बाटली
१/४ वाटी गुळ
१/२ चमचा मीठ
१ चमचा वेलची पावडर
२ चमचे लिंबू रस
कृती:
ॲपल सॉस स्लो कुकरमध्ये किंवा गॅसवर ३० मिनिटं मध्यम आचेवर उकळा. उकळत असतानाच गुळ घाला. गुळ घालताना आधी निम्माच घालून चव पाहून घ्यावी अजून गोड पाहिजे असेल तर उरलेला गुळ घालावा. अधून मधून ढवळायला विसरु नका. साधारण बाजूने तपकिरी रंग दिसायला लागला की गॅस बंद करा.

एक चमचा वेलची पावडर, चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस दोन तीन चमचे, (आणखी गोड हवं असेल तर गुळ न घालता  साखर घाला) आणि तुम्हाला जितकं  पन्हं पातळ पाहिजे त्या प्रमाणाने  पाणी घाला. गार झाल्यावर थंडगार होण्यासाठी  फ्रिजमध्ये ठेवा.

ॲपल सॉसची ४८ औंसची बाटली वापरली तर २० - २५ ग्लास पन्हं तयार होतं. ॲपल सॉस दुकानात सॉस/केचप ठेवलेल्या भागात/रांगेत मिळतं.


                                         

5 comments:

  1. mi without ukloon kele aahe, ukalalymule kay pharak padto?

    ReplyDelete
  2. सीमा धन्यवाद. उकळल्यामुळे कैरीसारखा स्वाद येतो.

    ReplyDelete
  3. मला पण सीमाचाच प्रश्न होता पण.. ..कैरीचा स्वाद येत असेल तर आता उकळून करून पाहीन :)

    ReplyDelete
  4. ekda tine sangitle ki uklun kara then what is the logic in not boiling? people dont follow instructions....this is the problem with maharashtrians!!

    ReplyDelete
    Replies
    1. इनस्ट्रक्शन फॉलो करण्यापेक्षा, असं करुन कसं होईल हा प्रश्न आहे त्यात चुकीचं काही आहे असं मला वाटलं नाही ॲनॉनिमस.

      Delete

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.