Saturday, December 6, 2014

खांडवी - कोकणातील गोड पदार्थ

साहित्य:
तांदूळ कण्या/रवा - २ वाट्या (कण्या नसतील तर तांदूळ धुवून सुकवायचे व नंतर मिक्सरमध्ये रवाळ
(जाडेभरडे) करायचे.)
गुळ: १ वाटी
पाणी: ४ वाट्या
तूप: ४ चमचे
मीठ : चिमुटभर
ओलं खोबरं : वड्यांवर घालण्यापुरतं, अंदाजे ४ चमचे

कृती:
  • तांदूळ कण्या न मिळाल्यास तांदूळ धुवून वाळवून घ्यावेत व मिक्सरमधून कण्या राहतील इतपत बारीक करावेत.
  • तूपावर लालसर रंग येईपर्यंत तांदूळ रवा भाजावा
  • पाणी उकळायला ठेवावे. उकळी फुटल्यावर गुळ घालून विरघळू द्यावा.
  • भाजलेला तांदूळ रवा टाकावा. एक दोन वाफा येऊ द्याव्यात. गोळा होईल असा शिजवून घ्यावा.
  • ताटाला किंवा ओट्यावर तूपाचा हात फिरवावा
  • ओलं खोबरं भुरभुरावं
  • त्यावर शिजत असलेला गरम गरम गोळा घालावा व हलक्या हाताने गोळा पसरावा. (हात न भाजू देण्याची काळजी घ्यावी.)
  • वरती पुन्हा ओलं खोबरं भुरभुरावं.
  • थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

    साधारण ३० ते ३५ वड्या होतात.





No comments:

Post a Comment

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.