Tuesday, August 26, 2014

पातोळे

हा बहुधा सारस्वती पदार्थ आहे. पण कोकणात सर्वत्र केला जातो.

साहित्य:
१ काकडी मध्यम आकाराची किसून
३/४ वाटी तांदूळ पीठ
१/२ वाटी गुळ
२ चमचे रवा
१ चमचा तेल किंवा तूप
चिमूटभर मीठ
हळदीची पानं ७-८

कृती:
काकडी सालं काढून किसून घ्या.
किसलेली काकडी आणि गुळ, तेल/तूप एकत्र गरम करायला ठेवा.
कढ आल्यावर रवा आणि मीठ घाला.
दोन वाफा येऊ द्या.
शिजलेले मिश्रण गार होऊ द्या.
हळदीची पानं उलटी करुन त्यावर अर्ध्या भागात छोटे छोटे गोळे थापा.
उरलेल्या अर्ध्या बाजूने पातोळा झाका.
इडली पात्रात किंवा कुकरच्या भाड्यांत (शिटी न लावता) घालून १५ मिनिटं वाफवा.
गार झाल्यावर तुपाबरोबर पातोळे खावेत. (हळदीचं पान खाऊ नये :-).

टीप: हळदीची  पानं नसतील तर केळीची वापरता येतात. ती देखील नसतील तर पार्शमेंट पेपरचा वापर करावा.












4 comments:

  1. हा स्वादिष्ट खाद्यपदार्थ कोकणात केला जातो याची मला माहिती असली तरी हा सारस्वती म्हणजे सारस्वत जातीचे लोक करतात ही माहिती मला नवीन आहे. आपण दिलेली माहितीनुरूप छायाचित्रे उत्तम आहेत. आपली अनुमती गृहीत धरून ही माहिती माझ्या काही सी. के. पी. मित्रांना कळवावी असे वाटते. अर्थात आपल्या या अनुदिनीचा दुवा त्यांना कळवत आहे.
    मंगेश नाबर

    ReplyDelete
  2. Mohana..Saraswats make these for Ganapati...we make it with coconut instead of cucumber....

    ReplyDelete
    Replies
    1. Anjali thank you. Looks like saraswats use "Modak Saran" for Patole.

      Delete

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.