Tuesday, January 14, 2014

पिझ्झा स्ट्रुडल (कॅलझोन)


साहित्य:
१६ औंस - पिझ्झा पिठाचा गोळा (कोणत्याही ग्रोसरी स्टोअर्स मध्ये मिळतो)
३/४ कप- रिकोटा चीज
३ कप - पालकाची पानं
१ कप - किसलेले (shredded Mozzarella) चीज
८ - तुळशीची पानं (ऐच्छीक)
१ - मोठ्या टॉमेटोच्या चकत्या
२ चमचे मैदा
१ ते २ चमचे  कोथींबीर, पुदिना अशी कोणतीही चटणी(ऐच्छीक)

कृती:
450°F वर ओव्हन गरम करा. ओव्हन गरम होईपर्यत बाकीची तयारी करा.
पिझ्झा पीठ फ्रिजमधून अर्धा तास तरी आधी बाहेर काढून ठेवा.
ओट्यावर १ चमचा मैदा भुरभुरवा. पिझ्झा पीठही १ चमचा मैद्यात घोळवून घ्या. 
तो गोळा लाटण्याने/हाताने आयताकृती पसरवा.  
पसरलेल्या पिझ्झा पीठावर चारी बाजून दुमडण्यासाठी जागा ठेवून 
रिकोटा चीज, (मसालेदार पाहिजे असेल तर कोथींबीर, पुदिना अशी कोणतीही चटणी रिकोटा चीज मध्ये घाला)
पालकाची पानं/ तुळशीची पानं पसरा.
टॉमेटोच्या गोल चकत्या पसरा.
त्यावर चीज पसरा. 
गुंडाळून गोल करा. चारी बाजू व्यवस्थित बंद करा. (पराठ्यांसाठी करतो त्याप्रमाणे)
बेकिंग ट्रे ला तेलाचा हात फिरवून त्यात ही गुंडाळी ठेवा. गुंडाळी ठेवल्यावर त्यावरही तेलाचा हात फिरवा (ऐच्छिक)
ओव्हनमध्ये १५ मिनिटं भाजा.
बाहेर काढल्यावर किचिंत गार झाल्यावर धारदार सुरीने कापा. साधारण ८ सॅडविच तयार होतात.


टीप: मसालेदार पाहिजे असेल तर कोथींबीर, पुदिना अशी कोणतीही चटणी रिकोटा चीज मध्ये घाला.







No comments:

Post a Comment

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.