Wednesday, March 27, 2013

बकलावा

बकलावा हा नक्की कुठून आलेला पदार्थ आहे याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. मध्यपूर्वेतील देशांना बाकलावा हा त्यांचा पदार्थ वाटतो. पण  असूर त्याचे  खर्‍या अर्थी त्याचे मालक आहेत. सणासुदीला हा पदार्थ करण्याची प्रथा होती. श्रीमंताची चैन म्हणून बाकलावाची ओळखला जाई.

नंतर हळूहळू मुळ पाककृतीत थोडा थोडा बदल होत गेला. आता ग्रीक आणि टर्कीश दोघंही बाकलावावर आपला हक्क सांगतात. टर्कीमध्ये तर म्हण प्रचलित आहे, "बकलावा रोज रोज खाण्याइतकी श्रीमंत नाही आपल्याकडे."

 फिलो डोव हा  शब्द  पान या ग्रीक शब्दापासून आला आहे. पानासारखं पातळ या अर्थी.

 साहित्य:  
१ पाकिट - (16 ounce) फिलो डोव (phyllo dough)  त्यातील एक गुंडाळी (Roll) (कोणत्याही दुकानात फ्रिझर भागात मिळतं)
३ वाट्या पिस्ते, अक्रोड, बदाम, पिकॅन्स (आवडीप्रमाणे एकच किंवा एकत्रित)
१ बटर स्टिक
१ चमचा दालचिनी कुटून
१ कप पाणी
५ चमचे साखर
१ चमचा व्हॅनिला अर्क/ वेलची पावडर
१/४ कप मध
६ लवंगा
   लिंबू
  किंचित मीठ

कृती:
फिलो डो पाकिटावरील सूचनेप्रमाणे बाहेर काढून ठेवा. (रात्रभर फ्रिजमध्ये)
अक्रोड, बदाम, पिस्ते कॉफी ग्राईंडर मधून सरबरीत करा. बारीक बारीक तुकडे रहायला हवेत. दालचिनी आणि ३ लवंगांची पावडर घालून मिश्रण एकत्र करा.
बटर स्टिक मायक्रोव्हे्वेबल भाड्यांत घालून १ मिनिटं गरम करा. तूप पातळ व्हायला पाहिजे.
फिलो डो पाकिटातून काढून सुकू नये म्हणून ओलसर फडक्याने झाकून ठेवा.
बेकिंग ट्रे मध्ये फिलो डोच्या चार पट्ट्या घाला. ब्रशने तूप लावा. एक ते दोन चमचे अक्रोड, बदाम, पिस्ता, पिकॅनचं मिश्रण फिलो डोच्या पट्ट्या वर पसरा.
एकू्ण आठ थर व्हायला पाहिजेत. पट्ट्या, बटर, मिश्रण असा प्रत्येकवेळेला क्रम ठेवा.
शेवटी सर्वात ८ पट्ट्या असायला हव्यात.
धारदार सुरीने चौकोनी किंवा पाहिजे त्या आकारात तुकडे कापा. (चित्र पहा)
३० ते ४० मिनिटं किंवा बाकलावाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत ३५० डिग्री फॅरेनहाईट्वर भाजा.

बकलावा तयार होईपर्यंत साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर विरघळली की व्हॅनिला आणि मध घाला, लिंबाचे एक दोन थेंब आणि अगदी किंचिंत मीठ. २० मिनिटं मंद आचेवर राहू द्या.

बकलावा झाला की ओव्हनमधून काढून ताबडतोब तयार झालेला मधाचा रस चमच्या चमच्याने त्यावर घाला. थंड होऊ द्या. बेकिंग ट्रे झाकू नका. थंड झाल्यावर बाकलावाचा आस्वाद घ्या.

साधारण 24 बकलावा तयार होतात.






9 comments:

  1. Got this link via facebook from one of my friend. good luck and waiting for your next recipe

    ReplyDelete
  2. Thank you Nirmala and welcome! Yes, I will post next recipe soon.

    ReplyDelete
  3. 'चविष्ट जग' वरची रेसिपीची लज्जत मोसम च्या लेखांप्रमाणे असावी ह्या शुभेच्छा.
    Please पदार्थ चवीला कसा आहे, यासोबत दिसायला कसा आहे , side dishesh काय असाव्यात हे पण सांगा.

    ReplyDelete
    Replies
    1. कलंदर धन्यवाद. सूचनांबद्दल मनापासून आभार. बाकलावाचे फोटो आहेत पोस्टच्यासोबत. हा गोड पदार्थ आहे. आता ते नमूद करते. साईड डिशेस काय असाव्यात हे लिहण्याची कल्पना पण छान आहे. पण बाकलावा गोडच असल्याने कोणत्याही प्रकारच्या जेवणानंतर खाता येतो.

      Delete
  4. Mohana, excited to see your new cooking blog. Good start with bakalava recipe. Few days back I got to eat baklava from famous Zalatimo sweet shop (operating since 1860) from Jordan, somebody visited Jordan from Cary he handed over few pieces...they were extra tiny and delicious..surprisingly it was filled only with Pista.

    Looking forward for more recipes.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Bharati. Yes, It is usually filled with Pistachios only, but pistachios are very expensive as Baklawa requires lots of and hence I use mix of everything.

      Delete
  5. Hi Mohana,

    Good to see you blogging. Came to know abt your blog via Gauri FB page. I always wanted to try Bakalawas when I was there. There are many blogs on food... but your first selected receipe stands out from all of those. Keep blogging.
    Ashwini Deshpande

    ReplyDelete
    Replies
    1. अश्विनी प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. खरं आहे पदार्थांचे ब्लॉग आता खूप आहेत पण वेगवेगळ्या देशातल्या पदार्थांना थोडं आपलं रुप, चव देऊन केलेले ब्लॉग माझ्यातरी वाचनात आले नाहीत त्यामुळे खूप दिवसांपासून मनात घोळत होतं ते कागदावर उतरतं आहे. आता तू भारतात आहेस का? तिकडे मी लिहेन त्या पदार्थांचं साहित्य उपलब्ध असेल तर नक्की कळव म्हणजे भारतातल्या मंडळीना पण हे पदार्थ करता येतील.

      Delete
  6. वाह मोहना खूपच छान वाटलं सगळ्या पाककृति वाचुन. मी करून बघतेय आता एक एक आणि मग सांगते कश्या झाल्या म्हणून. Thanks for sharing with us. Looking forward for your new recipe.

    Meghna Kulkarni

    ReplyDelete

नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.