साहित्य:
2 कप - आंबा रस (भारतीय दुकानात कॅनमध्ये मिळतो)
8 oz - क्रिम चीज आणि/किंवा कुल व्हिप - 8 oz ( ग्रोसरी स्टोअर्स मध्ये फ्रोझन गोष्टी असलेल्या विभागात)
1 (6 oz) ग्रॅम क्रॅकर पाय शेल - (ग्रोसरी स्टोअर्स मध्ये बेकिंग भागात)
2 पॅक - जिलेटीन - (ग्रोसरी स्टोअर्स मध्ये बेकिंग भागात)
2-3 चमचे - साखर
१/४ कप गरम पाणी
क्रिम चीज मऊसर होण्यासाठी फ्रिजमधून दोन तीन तास बाहेर काढून ठेवा
मऊसर क्रिम चीज काट्याने किंवा हॅंड मिक्सरने घोटा
दोन कप आंबा रसामध्ये क्रिम चीज आणि/किंवा कुल व्हिप आणि साखर घालून एकसंध होईपर्यत ढवळा
पाणी गरम करुन जिलेटीन पावडर हळूहळू त्यात घालून ढवळत रहा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या
घट्ट मिश्रण आंबा रसाच्या मिश्रणात घालून नीट एकत्र करा
हे मिश्रण पाय शेल मध्ये ओता, सजावटीसाठी बदाम, वेलची, कॉफी पावडर जे काही आवडत असेल ते वर भुरभुरवा आणि रात्रभर किंवा कमीत कमी सहा तास फ्रिजमध्ये ठेवा
फ्रिजमधून बाहेर काढून पायचे हवे त्या आकारात तुकडे करुन आस्वाद घ्या
![]() |
![]() |
|
|
![]() |
|