Wednesday, December 17, 2014

ओटमिल वड्या

साहित्य:
३/४  वाटी तूप (बटर - शेंगदाणे, तीळ, बदाम किंवा कोणतंही)
१/२ वाटी मध
३ वाट्या ओटमिल (सिरीयल) 

कृती:
ओटमिल (सिरीयल) भाजून घ्या. (हलका तपकिरी रंग येईपर्यंत)
भाड्यांत तूप आणि मध एकत्र गरम करा
भाजलेले ओट त्यात मिसळा
चिमुटभर मीठ घाला
सुका मेवा (बदाम, पिकॅन, खजूर) पाहिजे असेल तर घाला.
मिश्रण सपाट भाड्यांत पसरा.
फ्रिज मध्ये २ तास ठेवा.
वड्या कापा.

साधारण २० वड्या तयार होतात.






Saturday, December 6, 2014

खांडवी - कोकणातील गोड पदार्थ

साहित्य:
तांदूळ कण्या/रवा - २ वाट्या (कण्या नसतील तर तांदूळ धुवून सुकवायचे व नंतर मिक्सरमध्ये रवाळ
(जाडेभरडे) करायचे.)
गुळ: १ वाटी
पाणी: ४ वाट्या
तूप: ४ चमचे
मीठ : चिमुटभर
ओलं खोबरं : वड्यांवर घालण्यापुरतं, अंदाजे ४ चमचे

कृती:
  • तांदूळ कण्या न मिळाल्यास तांदूळ धुवून वाळवून घ्यावेत व मिक्सरमधून कण्या राहतील इतपत बारीक करावेत.
  • तूपावर लालसर रंग येईपर्यंत तांदूळ रवा भाजावा
  • पाणी उकळायला ठेवावे. उकळी फुटल्यावर गुळ घालून विरघळू द्यावा.
  • भाजलेला तांदूळ रवा टाकावा. एक दोन वाफा येऊ द्याव्यात. गोळा होईल असा शिजवून घ्यावा.
  • ताटाला किंवा ओट्यावर तूपाचा हात फिरवावा
  • ओलं खोबरं भुरभुरावं
  • त्यावर शिजत असलेला गरम गरम गोळा घालावा व हलक्या हाताने गोळा पसरावा. (हात न भाजू देण्याची काळजी घ्यावी.)
  • वरती पुन्हा ओलं खोबरं भुरभुरावं.
  • थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

    साधारण ३० ते ३५ वड्या होतात.