Tuesday, August 26, 2014

पातोळे

हा बहुधा सारस्वती पदार्थ आहे. पण कोकणात सर्वत्र केला जातो.

साहित्य:
१ काकडी मध्यम आकाराची किसून
३/४ वाटी तांदूळ पीठ
१/२ वाटी गुळ
२ चमचे रवा
१ चमचा तेल किंवा तूप
चिमूटभर मीठ
हळदीची पानं ७-८

कृती:
काकडी सालं काढून किसून घ्या.
किसलेली काकडी आणि गुळ, तेल/तूप एकत्र गरम करायला ठेवा.
कढ आल्यावर रवा आणि मीठ घाला.
दोन वाफा येऊ द्या.
शिजलेले मिश्रण गार होऊ द्या.
हळदीची पानं उलटी करुन त्यावर अर्ध्या भागात छोटे छोटे गोळे थापा.
उरलेल्या अर्ध्या बाजूने पातोळा झाका.
इडली पात्रात किंवा कुकरच्या भाड्यांत (शिटी न लावता) घालून १५ मिनिटं वाफवा.
गार झाल्यावर तुपाबरोबर पातोळे खावेत. (हळदीचं पान खाऊ नये :-).

टीप: हळदीची  पानं नसतील तर केळीची वापरता येतात. ती देखील नसतील तर पार्शमेंट पेपरचा वापर करावा.












Wednesday, August 6, 2014

बेजिल पेस्तो पिझ्झा

बेजिल पेस्तो सॉस इटलीतून आलं आहे. पास्तासाठी त्याचा मुख्यत्वे वापर केला जातो. हे सॉस मी पिझ्झासाठी वापरलं आहे. त्याची कृती इथे आहे. नाहीतर विकतचं वापरु शकता.

साहित्य:
१ पॅक पिझ्झा डोव - कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये deli cooler विभागात किंवा पिझ्झा चेनच्या दुकानात मिळेल.
१/४ कप श्रेडेड चीज
१ बटण मशरुम पॅक
१ भोपळी मिरची
१ कांदा
१ कॅन ऑलिव्ह

कृती:
ओव्हन ४५० डिग्री फॅरेनहाइट वर गरम करा
पिझ्झा डोव फ्रिजमधून काढून ठेवा.
भाज्या तिरक्या तिरक्या चिरा.
तव्यावर एकेक करुन भाजा (तेलाची आवश्यकता नाही). भाजताना थोडी मिरीपूड, मीठ भुरभुरवा, पाहिजे तर लिंबू पिळा
पिझ्झा डोव लाटण्याने पाहिजे त्या आकारात पातळसर लाटा. (त्याआधी पीठ चिकटू नये म्हणून खाली थोडासा मैदा/कणीक भुरभुरवा) एका बेकिंग ट्रे मध्ये रहात नाही त्यामुळे मी दोन ते तीन आयताकृती करते.
पेस्तो सॉस पसरा. (सॉस आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरु शकता.)
भाजलेल्या सर्व भाज्या पसरा.
वर चीज पसरा.
ओव्हनमध्ये १२ ते १५ मिनिटं बेक करा.

कसा झाला ते मला कळवा :-).

नेहमीच्या टॉमेटो सॉसपेक्षा पेस्तोमुळे वेगळी चव येते. मुलांना खूप आवडतो.

टीप - पेस्तो सॉसला पर्याय म्हणून आपली कोणतीही चटणी वापरु शकता.