Friday, June 28, 2013

रुगुला आणि बेजिल (तुळस) पेस्तो (चटणी) सॅडविच

साहित्य:
७-८ - बदाम
५ औंस - रुगुला   ( ग्रोसरी स्टोअर्समध्ये प्रोड्युस भागात)
बेजिल किंवा पेस्ट - ( ग्रोसरी स्टोअर्समध्ये प्रोड्युस भागात ट्युबमध्ये किंवा ताजी)
३ - लसूण पाकळ्या
३ औंस - पारमेसान चीज
२ चमचे - लिंबू रस 
 ३ औंस  - ग्रीक योगर्ट 
१ चमचा - मीठ 
१ चमचा - मिरी पावडर 

(सव्वा कप चटणी/पेस्तो तयार होतो.)

१  - भाजलेली लाल भोपळी मिरची 
१  - भाजलेली पिवळी भोपळी मिरची 
१/२ कप - कांद्याच्या चकत्या  
१ कप - भाजलेले मशरुम 
१/२ चमचा - मिरी पावडर 
८ - स्वीस चीज चकत्या 
१ - फ्रेंच ब्रेड - ३ सारखे तुकडे मधोमध कापून किंवा सिबॅटा रोल्स (हे चौकोनी आकारात कापलेले असतात आणि फ्रेंच ब्रेडपेक्षा चव चांगली लागते.)

पेस्तो/ चटणी कृती:
बदाम मंध्यम आचेवर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. फूड प्रोसेसरमध्ये बेजिल, रुगुला, लसूण, चीज, लिंबू रस, योगर्ट आणि भाजलेले बदाम घालून एकसंध मिश्रण तयार करा. मीठ, मिरी पावडर घालून मिसळा.

सॅडविच कृती:
ब्रेडला ऑलिव्ह ऑईल लावून ओव्हनमध्ये  १ - १ मिनिटं खालून वरुन, दोन्ही बाजूनी ग्रील करा
बाहेर काढून कापलेल्या ब्रेडवर १ ते २ चमचा दोन्ही बाजूला  पेस्तो पसरा
भोपळी मिरची, कांदा, मशरुम मिश्रण एका बाजूवर पसरा
दोन्ही किंवा एका बाजूवर स्वीस चीजची एक चकती घाला
ब्रेड ओव्हनमध्ये घालून चीज पातळ ग्रील करा. (दोन ते तीन मिनिटं) ग्रील करताना ब्रेड जळणार नाही यासाठी लक्ष ठेवावं लागतं.
बाहेर काढून गरम गरम सॅडविचचा आस्वाद घ्या.

भाज्यांच्या ऐवजी चिकन वापरुनही चांगले लागते. चिकन वापरल्यास तुकडे शिजवून घेऊन भाज्यांच्या जागी किंवा भाज्यांबरोबर वापरु शकता.












Thursday, June 27, 2013

बटाटा आणि राजमा (रेड बीन्स) एनचिलाडा


साहित्य:
३ ते ४ - बटाटे  -
१ - राजमा / रेड बीन्स कॅन  (१४ औंस)
१/४ कप - किसलेले चीज
१ चमचा  - गरम मसाला/चाट किंवा पावभाजी मसाला -  
८-१२ - टॉरटिया

१ कप - व्हेजीटेबल स्टॉक
१ कप - टॉमटे ज्यूस
१ चमचा - लिंबू रस  
१ चमचा - मीठ 
१ चमचा - तिखट  
२ चमचे - तेल 
१  - चिरलेला कांदा  
२ - लसूण पाकळ्या 
२ चमचे - कॉर्न स्टार्च
१ चमचा - चिरलेली कोथींबीर 

कृती:-
तेल गरम करुन चिरलेला कांदा त्यात परता, बारीक केलेली लसूण, जिरं पावडर आणि  चवीनूसार तिखट घाला.
थोडं परतून व्हेजिटेबल स्टॉक आणि टॉमेटो ज्यूस घाला. पाच मिनिटं मध्यम आचेवर उकळा.
कॉर्न स्टार्च थोड्याशा पाण्यात विरघळवून वरील मिश्रणात घाला. ढवळत रहा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करा.  थंड होऊ द्या.

बटाटे मायक्रोव्हेवमध्ये उकडून गार झाले की  सालं न काढता बारीक फोडी करा. (सॉस करत असतानाच बटाटे शिजवून घेऊ शकता)
कॅनमधले बीन्स (पाणी काढून टाका. ते वरच्या सॉसमध्ये वापरलं तरी चालेल), बटाट्याच्या फोडी, आणि निम्मं चीज एकत्र करा
मीठ, लिंबू रस, मसाला, कोथींबीर घालून मिश्रण तयार करा

बेकींग ट्रे त तेलाचा हात फिरवा किंवा स्प्रे ने सर्वत्र तेल शिडकवा
प्रत्येक टॉरटिया वर वरिल मिश्रण १ ते २ चमचे घालून एक चमचा सॉस घाला, डोशासारखी गुंडाळी करा
या क्रमाने बेकिंग डिश मध्ये मिश्रण भरलेले सर्व टॉरटिया लावा
वरती उरलेलं सर्व सॉस आणि चीज पसरा
३५० वर ३० ते ३५ मिनिटं बेक करा.

खाताना सावर क्रिम किंवा आणि गॉकोमॉले (Guacamole) वर घालून घ्या. खालील चित्रात चारच टॉरटिया दिसत आहेत कारण मी मोठ्या आकाराचे वापरले आहेत. छोटे घेतले तर ८ - १२  होतात. ट्रे छोटा असेल तर एकावर एक ठेवले तरी चालतात.














Wednesday, June 19, 2013

राईस क्रिस्पीज सिरीयलचा चिवडा

साहित्य:
१ - राईस क्रिस्पीज सिरीयल पुडा (अगोड)
१ मूठ - भाजलेले शेंगदाणे -
 ७ - ८ - कढीपत्यांची पान  (ऐच्छिक)
२५-३० - सुकं खोबर्‍याच्या चकत्या  
 २ -३ चमचे - डाळं 
१/२ डाव  - तेल
१ चमचा - तिखट/ लाल मिरची   
 १ चमचा साखर 
१ चमचा - मीठ  
फोडणीचे साहित्य (हिंग, हळद, मोहरी)
 १ चमचा - आमचूर पावडर  (ड्राय मॅंगो पावडर) 
 १ चमचा - गरम मसाला  
कृती:
पातेल्यात तेल गरम करुन फोडणी तयार करा. (तेल तापल्यावर मोहरी, हिंग, हळद तापलेल्या तेलात घालणे)
शेंगदाणे, सुकं खोबरं, डाळं, आमचूर पावडर, गरम मसाला, तिखट/ लाल मिरची , मीठ, साखर या क्रमाने एकेक करुन परता
राईस क्रिस्पीज सिरीयल घालून गॅस बंद करा आणि सर्व व्यवस्थित एकत्र करा
वरील सर्व साहित्य चवीनुसार कमी जास्त करता येतं.  नेहमीच्या पोह्याच्या चिवड्यापेक्षा याला तेल कमी लागतं, सिरीयल खायची सवय असणारी मुलं आवडीने खातात.